Ad will apear here
Next
नवमहाराष्ट्राच्या जडणघडणीत शास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वाचे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन


मुंबई :
‘नव्या संकल्पना आणि नवे विचार घेऊन नवमहाराष्ट्राची जडणघडण होण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांचे योगदान महत्वाचे आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक जानेवारी २०२० रोजी मंत्रालयात डॉ. माशेलकर यांच्याशी नव्या महाराष्ट्राच्या व्हिजनबाबत चर्चा केली. ठाकरे म्हणाले, ‘राज्यातील युवकांना नवी दिशा देण्यासाठी आणि युवाशक्तीचा राज्याच्या विकासासाठी उपयोग करून घेण्यासाठी त्यांना तंत्रज्ञान युगातील नव्या प्रवाहाची माहिती देणे आवश्यक आहे. कृषी विकासासाठीदेखील नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार आवश्यक आहे. यासाठी पुणे इंटरनॅशनल सेंटरचे सहकार्य उपयुक्त ठरेल.’

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पनांच्या उपयोगाद्वारे सर्वसमावेशक विकासाला गती देणे, राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी थिंक टँक म्हणून पुणे इंटरनॅशनल सेंटरचा उपयोग करणे, कृषी क्षेत्रातील आव्हाने आणि शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी नव्या तंत्राचा उपयोग, रोजगाराला चालना देणाऱ्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल, स्टार्ट अप, रोजगार आणि संपत्तीच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीची भूमिका, जीएसटीमधील सुधारणा अशा विविध विषयांवर या वेळी मुख्यमंत्र्यांनी डॉ. माशेलकर यांच्याशी चर्चा केली.

पुणे इंटरनॅशनल सेंटर राज्याच्या विकासासाठी शासनास सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे या वेळी डॉ. माशेलकर यांनी सांगितले. 

एक जानेवारी रोजी डॉ. माशेलकर यांचा वाढदिवस होता. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZYLCI
Similar Posts
‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ : देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर झाला. आता राज्याचा अर्थसंकल्प सहा मार्चला सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर, अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी कोणालाही मार्गदर्शक ठरेल, असे पुस्तक माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले असून, ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ असे त्याचे नाव आहे
‘मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होणार’ मुंबई : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल,’ असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाच नोव्हेंबर रोजी केले.
मुंबई मराठी पत्रकार संघात १६ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी अंकांचे भव्य प्रदर्शन मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाने दर वर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी अंकांचे भव्य प्रदर्शन ११ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत आयोजित केले आहे.
पुनश्च हरिओम; आजपासून लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल; अशी आहे राज्य सरकारची सविस्तर नियमावली मुंबई : ‘मिशन बिगिन अगेन’ या अभियानांतर्गत राज्य सरकारने लॉकडाउनमधील निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात तीन जून, पाच जून आणि आठ जून अशा तीन टप्प्यांत केली जाईल. यामुळे राज्याच्या अर्थचक्राला पुन्हा गती मिळणार आहे. काही निर्बंधासह रिक्षा, स्कूटर या वाहनांना परवानगी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language